नाना शंकर शेठ
नाना शंकर शेठ यांचा जन्म 10 फेब्रुवारी
1803 रोजी झाला. नाना शंकर शेठ यांचे मुळ आडनाव मुरकुटे होते.त्यांचे जन्म ठिकाण
मुरबाड,जी.ठाणे होते.त्यांनी बॉम्बे नेटिव एज्युकेशन सोसायटीची स्थापना
एलफिन्स्टनच्या मदतीने केली.या संस्थेचे कार्य शाळा काढणे हे होते.
त्यांनी अनेक संस्थाना आर्थीक मदत केली.जसे
की “स्टुडंट लिटररी ॲण्ड सायंटिफीक सोसायटी, बॉम्बे अशोसियशन , एलफिन्स्टन
कॉलेज,ग्रेट मेडीकल कॉलेज,तसेच मुंबई विद्यापीठ स्थापनेत नानांचा सहभाग होता.
बॉम्बे अशोसियशन
बॉम्बे अशोसियशनची स्थापना नाना शंकर
शेठ व दादाभाई नौरोजी यांनी ई.स.1852 साली केली.या संस्थेचा उद्देश जनतेचे दु:ख इंग्रज
सरकारच्या निदर्शनास आणणे हा होता.त्यांनी मुंबईच्या पायाभुत सुविधा सुधाराव्यात
म्हणून त्यांनी स्वतः जवळील संपत्ती मुंबईच्या विकासासाठी लावली.म्हणून त्यांना मुंबईचे शिल्पकार म्हणतात.
आचार्य आत्रेंनी त्याना “मुंबईचे अनभिषीक्त सम्राट असे म्हटले आहे
No comments:
Post a Comment
Thanks for comment